ज्येष्ठ- पञकार --श्रीपूर
बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी.
उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा भव्य दिव्य मेळावा होत आहे मराठ्यांची एकी ताकद आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जागृत झाली आहे उद्याच्या नभुतो न भविष्यती कार्यक्रमाची धास्ती महाराष्ट्र शासनाने घेतलीं आहे त्याचप्रमाणे ओबीसी नेते छगन भुजबळांच्या पोटात उद्या होत असलेल्या कार्यक्रमामुळे काल दुपार पासून पोटात गोळा आला आहे त्यांनी मेळाव्याला एवढा निधी कुठुन आला हा बालीश प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून लोकवर्गणी जमा करून सदर कार्यक्रमाला हातभार लावला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे कुठल्या राजकीय पक्षापुढे हात पसरायला गेले नाहीत किंवा धनदांडग्या उद्योगपती दोन नंबरच्या धंधदेवालयांकडे भिख मागितली नाही मनोज जरांगे पाटील हा नेक माणूस आहे कोणापुढे झुकणार नाही वाकणार नाही तो स्वतःचे बलिदान देईल पण विकला जाणार नाही याची खात्री व विश्वास तमाम मराठा समाजाला आहे उद्या निश्चितच निर्णय व पुढील आदेश व यावर तोडगा अपेक्षित आहे छगन भुजबळ मुंबई मध्ये भायखळ्याच्या भाजी मंडईत डोक्यावर भाजीची टोपली घेऊन भाजी विकत होते त्यांनी आजची सांपत्तिक स्थिती पाहिली तर त्यांना असा कोणता परिस सापडला व ते अब्जाधीश झाले गेल्या काही वर्षापुर्वी मुंबईत शिवाजी पार्कवर समता परिषदेचा त्यांनी मेळावा घेतला होता त्यांनी पंधराशे एसटी बसेस पंचवीस रेल्वे बुक केल्या होत्या सदर मेळाव्याचा खर्च कित्येक कोटींच्या घरात गेला होता तो निधी त्यांनी कुठुन व कसा मिळवला यांचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावे उद्या होत असलेल्या महामेळावा व आक्रमक भुमिका असलेल्या मेळाव्याची धास्ती घेऊन अगोदर पैसे भरून रितसर पावती घेऊनही एसटी गाड्या काल रात्री अचानक देता येणार नाहीत म्हणून विभागीय व जिल्हा एसटी अधिकारी यांनी एसटी रद्द केल्या आहेत एकंदरीत उद्याच्या मेळाव्याला अनेकांना उपस्थित रहाता येऊ नये ही त्यांची खेळी आहे सूर्य कोंबडा झाकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा