Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

*शालेय व्यवस्थापन समितीच्या -अध्यक्षपदी -- "चाँदसाहेब शेख" यांची फेरनिवड*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

-तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्यात आली  असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या सकारात्मक कामाची पोहच पावती त्यांना पालक व ग्रामस्थांनी बहाल केली 

   मंगळवार २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालक मेळावा घेऊन पालकांतुन सर्वप्रथम १० पालक सदस्यांची व उर्वरित ग्रामपंचायत सदस्य , ज्येष्ठ शिक्षक , शिक्षणप्रेमी नागरिक , विद्यार्थी प्रतिनिधी , मुख्याध्यापक अशी १५ जनांची समिती नियुक्त करण्यात आली व सर्वांच्या संमतीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळावा व गुणवत्ता वाढावी यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील असणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला व उपाध्यक्षपदी दिलीप जाधव यांची निवड करण्यात आली 

चांदसाहेब शेख यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस , पालकांनी विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा करावा व शालेय साहित्य वाटावे यासाठी प्रयत्न , कामचुकार व अवेळी येणाऱ्या शिक्षकांना तंबी वजा सूचना , पोषण आहाराची पालकांसोबत वेळोवेळी तपासणी यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यशस्वी झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली        यापालक मेळाव्यास  उपसरपंच गिरीश डोंगरे , ग्रामपंचायत सदस्य आदमशा फकीर , आप्पासाहेब जेटीथोर , विजय गरगडे यांनी सखोल मार्गदर्शन करून ही निवड पारदर्शक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक डोलारे , पालक अच्युत कापसे , किरण पारधे , मुकुंद सरडे , शिक्षिका हेरकर मॅडम , येरटे मॅडम यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार चांदसाहेब शेख यांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा