इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- पुणे व सातारा परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनी व विर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येवून मिसळत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत ८० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. तर विर धरणातून नीरा नदीत ७१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात असल्याने नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ५० हजाराचा विसर्ग वाहत आहे. तर भिमा नदीवरील तीन बंधाऱ्यासह गणेशवाडी पुल पाण्याखाली जावून ही यावरून वाहतूक सुरूच होती. तसेच नीरा नदीवरील बंधाऱ्यांवरून पाच फूट पाणी वाहत आहे.
पुणे परिसरात सततच्या पावसामुळे परीसरातील धरणे फुल्ल झाल्याने पाणी खाली सोडले जात आहे. त्यामुळे उजनी धरणात वरील धरणातून ८९७५८ हजार क्युसेक्स पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत ८० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून त्यामध्ये रात्री वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता उजनीतून विज निर्मितीसाठी १६००, कालवा १६००, बोगदा २००, सिनामाढा उपसा १७५ तर दहिगाव उपसा ८० क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. पाणी पातळी ४९७.०३० मिटर, पाणीसाठा ११९.६२ टिएमसी, १०४.४६ टक्के भरले असून दौंड येथून उजनी धरणात ८९७५८ क्युसेक्सचा विसर्ग येत आहे.
वीर धरणातून नीरा नदीत ७१ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग रात्री पासून सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा व नीरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे पुन्हा पूर सदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे - विर धरण व पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भिमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले यांना जोडणाऱ्या पुलावरून सायंकाळी सात वाजता जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने यावरून धोकादायक वाहतूक सुरूच होती. तर भांडगाव, टणू, नरसिंहपूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर नीरा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले असून बंधाऱ्यांवर तीन ते पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे यावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.
फोटो - १) गणेशवाडी - गारअकोले पुलावरून तीन फूट पाणी वाहत असतानाही यावरून धोकादायक वाहतूक सुरूच होती.
२) सराटी येथील बंधाऱ्यांवरुन जवळपास पाच फुट पाणी वाहत आहे.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा