Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

प्रवीण भैय्या माने यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व प्रवीण भैय्या माने यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम शनिवार २८ सप्टेंबर रोजी वाघ पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित प्रत्येक लाडक्या बहिणीस मानाची पैठणी भेट दिली जाणार असल्याने सर्व महिला भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

     कार्यक्रमास शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वहिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता बाळकृष्ण नेहरकर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. यावेळी इंदापूर तालुक्यातील आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, नर्सेस आदि सहभागी होणार आहेत. सहभागी सर्व भगिनींना मानाची पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे.

    इंदापूर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभाग घेऊन खेळल्यास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रथम स्कुटी, दुसरे एलईडी ४३ इंची सॅमसंग, तिसरे फ्रिज, चौथे वाॅशिंग मशिन तर पाचवे पिठाची गिरणी बक्षिस देण्यात येणार आहे. 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा