*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील शेतकरी शाबुद्दीन बासु शेख यांच्या घरी सराईत गुन्हेगार सोहेल शौकत शेख रा.भरणेवाडी ता.इंदापूर याने आपल्या दोन साथीदारासह येऊन सोनालिका डी.आय.३० कंपनीचा टॅक्टर एम.एच २५ ए.डी.२३७२ नंबरचा हा ट्रॅक्टर शेख यांना खोटा चेक देत चावी द्या ट्रॅक्टरची आम्ही ट्रायल बघतो म्हणून ट्रॅक्टरच दिवसा ढवळ्या चोरून नेला आहे.या फसवणूक प्रकरणी शाबुद्दीन शेख यानी इंदापूर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे.आरोपी टॅक्टर चोर सोहेल शौकत शेख व त्याचे साथीदार यांनी यापूर्वी अनेक लोकांना याच पद्धतीने फसवणूक करून लोकांना फसवले आहे असे निदर्शनास आले आहे.वर उल्लेखित नंबरचा सोनालिका ट्रॅक्टर कोणाच्या निदर्शनात आल्यास त्वरित ९८६००२२७८५ या मोबाईल नंबरशी संपर्क साधावा.
एक महिना उलटून गेला तरी इंदापूर पोलीसांना चोर सापडत नाही आहे.त्यामुळे पोलीस तपासावरती सर्वसामान्य माणसांचा विश्वास राहिला नाही. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्हेगारवरील तक्रार दाखल करायला तयार नसतात.जर तक्रार दाखल करून घेतली तर ती साध्या कागदावर तक्रारदार कडून अर्ज लिहून घेतला जातो. नंतर त्या अर्जावर दुर्लक्ष केले जाते नाहीतर अर्ज कच-यात टाकला जातो.इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करून घेतली जात नाही आहे.आणी जर तो चोर भरणेवाडीचा असला तर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आज संपूर्ण महाराष्ट्रात गृह खात्याचे धिडोंरे उडत असताना मात्र इंदापूर पोलीस चोरांना पाठीशी घालत आहेत.असे चित्र इंदापूर तालुक्याच दिसत आहे.त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीबांना नेहमीच इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये चोर शिपाईंचा खेळ पहावयास मिळतो.त्यामुळे सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा