*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
निरपेक्ष सामाजिक कार्य, महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणे आणि तळागाळातील लोकांसाठी झटणे या कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्वेता ताई दुरुगकर यांनी राजकारणात दमदार पाऊल ठेवत प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) युतीच्या पहिल्या जिल्हाध्यक्ष (युवती) म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत संघटन मजबूत करण्यासाठी भरीव काम केले. महिलांना राजकीय प्रवाहात सक्रिय सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली घडले.
सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या जिल्हाध्यक्ष – युवती सेना या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता ताई दुरुगकर या पूर्ण जोमाने संघटनात्मक बांधणी, महिला सक्षमीकरण आणि युवतींच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत काम करत आहेत.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीचा संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी हीच त्यांच्या कार्याची ओळख बनली आहे. श्वेता ताईंच्या या कार्यामुळे त्या आज जिल्ह्यातील महिला नेतृत्वाचा मजबूत चेहरा म्हणून पुढे येत आहेत.
सामाजिक कार्यातून उभारी घेतलेले नेतृत्व, आणि नेतृत्वातून समाजकारणाची दिशा ठरवणारी श्वेता ताई दुरुगकर यांची वाटचाल अनेक युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. ✨




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा