*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
शिखर शिंगणापूर यात्रा व एकादशीनिमित्त बावडा येथील सोमनाथ मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे माजी संचालक महादेवराव घाडगे यांचे हस्ते महाअभिषेक व पूजा करण्यात आली. धार्मिक विधीचे पौराहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले. यावेळी शंकरराव घाडगे, अंकुश घाडगे, अरुण घोगरे, संभाजी घाडगे, किसन सूर्यवंशी, दत्तात्रय भुजबळ, दादा कांबळे, ओम घाडगे, हर्षराज घाडगे व भविक उपस्थित होते. तसेच मंदिरामध्ये सायंकाळी कामाक्षी पद्मावती महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर रात्री हरिजागर करण्यात आला. तसेच पिंपरी बुद्रुक येथील महादेव मंदिरात महाअभिषेक व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
फोटो -शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त बावडा येथील सोमनाथ मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा