*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज आणि परिसरातील मुस्लिम बांधवांन
अकलूज येथील निरा नदी काठी असलेल्या ईदगाह मैदानावर बकरी ईद मोठ्या भक्ती भावाने साजरी केली
या ईद निमित्त ईदगाह मैदानावर बकरी ईद ची नमाज खुत्बा व तकरीर( प्रवचन) काझी गल्ली मदिना मज्सिदचे पेश इमाम हाफीज मेहमूद आलम रिझवी यांनी दिला
याप्रसंगी समाज बांधवांना ईद चे महत्व विशद करताना हाफीज महमूद आलम रिझवी म्हणाले कि मुस्लिम समाजातील इतर सणांना महत्त्व असते त्याप्रमाणे या सणाला अनन्यसाधारण महत्व असून बकरीद म्हणजे त्याग, समर्पण व बलिदानाचे प्रतीक असल्याचे असल्याचे याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बकरी ईद च्या नमाजचे आयोजन सकाळी ८/३०वाजता केले होते
या ईद निमित्त अकलूज नगर परिषद व अकलूज पोलीस स्टेशन प्रशासनाचे अनमोल सहकारी लाभले
या ईद निमित्त देशात सुख शांती, समता बंधुता एकता नांदो अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली
बकरी ईदच्या नमाज नंतर सर्व धर्माच्या समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा