उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर, येथील ऋतुजा निखिल नागटिळक-ढोक हिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पात्त उल्लेखनीय योगदान देत आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे. २०२३ पासून ती मुंबई येथील अल्ट्राफोंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इटली-आधारित बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
ऋतुजाचे शालेय शिक्षण माळीनगर येथील दि मडिल विविधांगी प्रशालेत झाले आहे. 'मिसिंग लिंक' हा सुमारे ९ किमी लांबीचा व २१ मीटर रुंदीचा जगातील सर्वात लांब बोगदा मानला जात असून, या बोगद्यात प्रवास सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अत्याधुनिक अल्ट्राफॉग वॉटर मिस्ट सिस्टीम बसविण्यात आली असून, या प्रणालीच्या उभारणीत ऋतुजा आणि तिच्या टीमचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहे.
ही वॉटर मिस्ट प्रणाली उच्च दाब नोजल्सद्वारे पाण्याचे सूक्ष्म थेव तयार करून आगीवर नियंत्रण
मिळवते. पारंपरिक सिप्रंकलरपेक्षा कमी पाण्यात आग वेगाने आटोक्यात आणण्याची क्षमता यामध्ये आहे. उष्णता शोषून घेणे व बाष्पीभवनाद्वारे ऑक्सिजन कमी करणे ही तिची वैशिष्टयपूर्ण कार्यपद्धती आहे. मरीन, डेटा सेंटर्स आणि संवेदनशील ठिकाणी ही प्रणाली प्रभावी ठरते, असे ऋतुजाने सांगितले.
बोगद्यात एखाद्या गाडीला आग
6 लागली तर सेन्सरद्वारे अल्ट्राफॉग वॉटर मिस्ट प्रणाली कार्यान्वित होऊन आग आटोक्यात येते त्यामुळे पुढील धोका टळतो. ट्रॅफिक जाम होत नाही.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा