Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

*मालवण येथील गडावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्या बाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची शिवप्रेमी ची मागणी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळून घडलेल्या घटनेबाबत सांबाधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावे अशी मागणी  तुळजापूर येथील शिवप्रेमींच्या वतीने पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन तुळजापूर यांना गेलेल्या निवेदना द्वारे  मागणी केली आहे  


 

        याबाबत सविस्तर वृत्त असे कि  मालवण येथील श्री छञपती  शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण गेल्या 8 महिन्याच्या पूर्वी  झालेले असताना हा पुतळा खाली कोसळला त्याचा सर्व शिवप्रेमी व  आम्ही सर्व महाराष्ट्र वासीय   निषेध करीत आहोत. राज्यात अनेक उंच गडावर शिवरायांचे पुतळे आजही शेकडो वर्षापासून दिमाखात उभे आहेत मात्र आठ महिन्यापूर्वी अनावरण केलेल्या पुतळा कोसळतोच  कसा? हे संशयास्पद बाब आहे तरी संबधित आधिकारी व गुत्तेदार यांनी मोठ्या प्रमाणात  भ्रष्टाचार  झाला असून या प्रकरणाची SIT चौकशी करून समिती नेमावी बसेच संबधित अधिकारी व गुत्तेवार यांच्यावर आपल्या पोलीस स्टेशन  अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा. अन्यथा  तीव्र  आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.



    या निवेदनावर जीवनराव गोरे, शाम पवार, सुधीर कदम ,अमोल कुतवळ ,ॲड. धीरज आप्पासाहेब पाटील, ऋषिकेश अशोक मगर, किरण माणिकराव यादव, कुमार रामभाऊ ठेले, प्रशांत चंद्रकांत इंगळे, अक्षय धनंजय कदम ,नागनाथ नारायणराव जगताप, विकास गोविंदराव जगताप ,अमोल शिवाजी जाधव ,,बापूसाहेब मारुतीराव नाईकवाडी ,अमर नाना चोपदार ,प्रमोद भाजी ,महेश रेणके, गुलजार खान, बालाजी देवकर ,विशाल गोसावी ,इत्यादी शिवप्रेमींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा