Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

गणेशगांव येथे अस्मिता लोकसंचलित सधन केंद्र महाळुंग अंतर्गत जनकल्याण ग्रामसंघाची दुसरी वार्षिक सभा संपन्न .


 

उपसंपादक --नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

जनकल्याण ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत पार  पडली .



 गणेशगावचे सरपंच सदाशिव शेंडगे माजी सरपंच पोपट रुपनवर , फीनिक्स इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांच्या हस्ते सावित्री मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.या प्रसंगी संयोगिनी मनीषा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नूरजहाँ शेख यांनी महिलांना वेगवेगळ्या  शासकीय योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले .



सरपंच सदाशिव शेंडगे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करीत मनोगत व्यक्त  केले.या प्रसंगी बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या ,फुगडी , संगीत खुर्ची अशा मनोरंजनात्मक स्पर्धा या कार्यक्रमात घेण्यात आल्या .हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सरपंच सदाशिव शेंडगे , संयोगिनी मनीषा जाधव , सी आर. पी. रेश्मा शेख यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा