Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

*कृषी विभाग चार तालुक्याचे प्रमुख-" बाळासाहेब लांडगे" यांची नातेपुते मंडळ मध्ये झंझावती दौरा, तपासणी, प्रक्षेत्र भेट ,मार्गदर्शन ,सल्ला व आवाहन!*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

मंडल कृषी अधिकारी नातेपुते अधिनस्त नातेपुते फोंडसिरस पिरळे, बांगर्डे , दहीगाव, पिपरी , गुरसाळे व धर्मपुरी या गावात दिनांक 17 ऑगस्ट रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर श्री बाळासाहेब लांडगे साहेब यांनी शनिवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी झंजावती दौरा करून दौऱ्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिक श्री राहुल राजेंद्र काळे ,नातेपुते यांचे बाजरी या पिकाचे एक एकर प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करून समाधान व्यक्त केले व दिलेल्या निविष्ठाची मिळाले बाबत खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत भाग घेण्याबाबत आव्हान केले . नातेपुते मधील श्री सत्यजित सावंत यांचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना अनुदानित विविध फळांचे रस निर्मिती प्रक्रिया व पॅकिंग या प्रकल्पास भेट देऊन संबंधित लाभार्थी चर्चा केली भेटी अंतर्गत प्रक्रियायुक्त पदार्थाचे टेट्रापॅक मध्ये पॅकिंग करून विक्री करण्याचे मार्गदर्शन केले . फोंडशिरस येथील राज्य पुरस्कृत यांत्रिक रण योजना अंतर्गत श्री शामराव भीमराव शेंडे यांचे पाच फुटी रोटावेटर ची तपासणी केली व शेतकऱ्याला संबंधित कंपनीकडून विक्री पश्चात सेवा मिळते किंवा नाही याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले .मौजे बांगर्डे येथील मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे खोदाई व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्लास्टिक अस्तरीकरण व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिक प्लॉट ची श्री नाथा दादा दडस यांचे क्षेत्रावर प्रक्षेत्र भेट करून संबंधित शेतकऱ्याला ठिबक सिंचनाद्वारे शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले .मौजे बांगर्डे येथील श्री शशिकांत महादेव लवटे यांचे डाळिंब दोन एकर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत केलेल्या संचाची तपासणी केली व लाभार्थीला नियमित संचाला आम्ल प्रक्रिया व ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूप खताचे नियोजन व वापर बाबत मोलाचा सल्ला दिला . मौजे पिंपरी येथील माऊली यशवंत करचे यांचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत मका पीक प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रावर प्रक्षेत्र भेट करून लष्करी अळी नियंत्रण व पीक स्पर्धेत लाभ घेण्याबाबत संबंधित शेतकऱ्याला आव्हान केले. या दौऱ्याअंतर्गत मौजे द हीगाव येथील सौ पंचशीला बाळू धाईजें यांचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड आंबा केशर दोन एकर क्षेत्रावरील लागवड ठिबक सिंचन संच यांची तपासणी करून संबंधित शेतकऱ्याला मँगो नेटवर नोंदणी करण्याचे व ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले .दहीगाव मधील श्री कैलास मारुती नाकोरे यांचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत डाळिंब दोन एकर लागवड ची प्रक्षेत्र भेट करून आंतरपीक घेण्याबाबत व ठिबक सिंचनाचा वापर करणे बाबत संबंधित शेतकऱ्याला आव्हान करण्यात आले . मौजे धर्मपुरी येथील सौ इंदुबाई डिकोळे यांचे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत दिलेल्या डबल पलटी नांगरचा मोका तपासणी करून संबंधित शेतकरी बंधूंना मजूर टंचाई व उपलब्ध यावर कृषी यांत्रिकीकरण करण्याचे मार्गदर्शन व आव्हान करण्यात आले . गुरसाळे येथील सौ सुजाता संजय ढवळे यांचे प्रधानमंत्री सुख सिंचन योजना अंतर्गत ऊस दोन एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचन संचाची तपासणी करून शेतकऱ्याला द्रवरूप द्रवरूप खते ठिबक सिंचनाद्वारे देणेबाबत सल्ला देण्यात आला व ठिबक सिंचन काळाची गरज याबाबत महत्त्व पटवून देण्यात आले .दौऱ्याच्या शेवटी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षित शेती मधील श्री अनिल नामदेव निगडे यांचे एक एकर सपाट शेडनेट हाऊस च्या उभारणीची तपासणी करून संबंधित शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात आले .या संपूर्ण दौऱ्याचे नेटके आयोजन व नियोजन आयएसओ  9001 :2015 मान्यता प्राप्त मंडल कृषी अधिकारी नातेपुते सेवारत्न श्री सतीश कचरे व त्यांचे  टीम ने केले .दिवसभरात 13 प्रक्षेत्र भेटी चा झंझावती दौरा करून माननीय उप विभागीय कृषी अधिकारी पंढरपूर ,श्री बाळासाहेब लांडगे साहेब यांनी मंडल नातेपुते कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पाठीवरील थाप देऊन शाब्बासकी दिली व मंडल कृषी अधिकारी अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह वाढवला



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा