*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
श्री चक्रधर स्वामी संयाेजक समिती, शेवाळा,ता.कळमनुरी,जि.हिंगाेली आयोजित श्री चक्रधर स्वामी वाड्:मय पुरस्काराने लेखक इंद्रजीत पाटील सन्मानित हाेणार आहेत.येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये सदर पुरस्काराचे वितरण हाेणार असून जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी चरित्र ग्रंथाला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अनिल शेवाळकर,प्रा.रमेश वाघमारे,डाॅ.काळे,सागर कपाटे,वैभव वानखेडे,यशवंत जामाेदकर,गाेविंद आराध्ये,संताेष लांडगे, उत्तमराव सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.तर संस्थेचे अध्यक्ष/संयाेजक अनिल शेवाळकर व गाेविंद आराध्ये यांनी अधिकृतरित्या सदर पुरस्काराची घाेषणा केली.
लेखक इंद्रजीत पाटील यांच्या या साहित्यिक गरूड भरारी बद्दल श्री पंडितराव लोहोकरे,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा