*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
पुणे : बदलापूरमधील 2 अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील एका नामांकित शाळेत एका मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीवर शाळेतील विद्यार्थ्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.पुण्यातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे.
*काय घडले नेमके?*
5 ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकणारी असून हा आरोपी तरुण देखील त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री असे आरोपी तरुणाचे नाव असून तो 19 वर्षांचा आहे. या तरुणाने पीडित तरुणीवर शाळेतील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात देवराज आग्री विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक ही करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तसेच शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडल्याच उघड झालं आहे. या तरुणावर समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात 74, 75 (1) (i) पोक्सो 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर*
या 2 प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळांमधूनच असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे मुलं शाळेत तरी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्य सरकार यावर काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा