Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

*"बदलापूर "घटनेच्या निषेधार्थ "महाविकास आघाडी" कडून 24 ऑगस्ट रोजी- महाराष्ट्र बंदची- हाक!*


 

विशेष ----प्रतिनिधी

  एहसान  मुलाणी

 टाइम्स 45 न्युज मराठी

   मो--9096 837 451

*मुंबई-* बदलापूर घटनेत सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत आहे तसेच या प्रकरणावर सरकारकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचे सांगत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले.


महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठकी संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या १० वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली. महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.


त्यामुळे येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल, असं नाना पटोले म्हणाले. बदलापूर घटनेटत शाळा आणि इतर प्रशासनाने दिरंगाई केली असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तसेच सरकारकडूनही कारवाई करण्याबाबत दिरंगाई झाली. त्यातही बदलापूर आंदोलनावर सत्तापक्षातून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी आहेत. सरकारने संवेदनशीलपणे हा मुद्दा हाताळावा, असे नाना पटोले आणि जयंत पाटील म्हणाले. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांवर आणि महायुती सरकारच्या कारभारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील आम्ही तिन्ही पक्ष सामिल होऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा