*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
अकलूज नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या पंचवटी भागातील नागरिकांना रस्ते पाणी गटारी दिवाबत्ती या पायाभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित रहावे लागले आहे या पायाभूत मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांना भेटून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती परंतु आजतागायत येथील नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या पायाभूत सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिल्या नाहीत यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना लहान मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे या होणाऱ्या त्रासाबाबत येथील स्थानिक नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना फोनवरून कळविल्यानंतर स्थानिक नागरिकांना नगरपरिषदेला बोलावून अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना भेटून पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दोन दिवसांमध्ये स्थानिक नागरिकांना तात्पुरता मुरूम रस्ता तयार करून देण्यात येईल व या भागातील राहिलेली सर्व विकासकामे 6 महिन्यांच्या आत केली जातील असे सांगितले यावर येथील स्थानिक नागरिकांना दोन दिवसांमध्ये रस्ता तयार करून न दिल्यास सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकनर पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला होता त्यानंतर नगरपरिषदेने दोन दिवसांमध्ये रस्ता रोलिंग करून रस्त्यासाठी मुरूम आणून टाकला परंतु रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले म्हणून येथील स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सोमवार 9 सप्टेंबर रोजी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले परंतु मुख्याधिकारी मीटिंगसाठी मुंबईला गेल्याने यांच्या कार्यालयामध्येच महापुरुषांच्या घोषणा देऊन धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली त्यानंतर अकलूजनगर नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक निंबाळकर मॅडम कर विभाग प्रमुख नरुटे बांधकाम विभाग प्रमुख भगनूरे पाणीपुरवठा विभाग प्रमुख शेटे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून रस्ता मुरमीकरणाचे काम त्वरित सुरू करीत असून काम मोठे असल्याने रस्ता पूर्ण करण्यास तीन दिवस लागतील त्यामुळे तीन दिवसाचा वेळ द्यावा तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी आठ दिवसांचा वेळ द्यावा अशी लेखी विनंती केल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पंचवटी भागातील स्थानिक आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आपण दिलेल्या वेळेमध्ये रस्ता व पाण्याचे काम पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले त्यानंतर लेखी पत्र घेऊन आंदोलन थांबविण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका युवक अध्यक्ष सचिन मोरे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सह संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख संदीप तोरणे सह प्रसिद्धीप्रमुख योगेश डावरे शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे युवक शहराध्यक्ष अशोक कोळी अरुण कोळी सचिन कोळी विनोद सावंत माधुरी वाघचौरे अलका किर्ते सुरज रणदिवे अशोक कारंडे दत्ता वाघमारे आदेश थोरात अनिकेत शिंदे मन्सूर काझी मच्छिंदर कोडक सारिका माने संगिता गायकवाड छाया लोखंडे रेखा चांदणे गिरजा कारंडे तनुजा शेख मदिना तांबोळी राधा निंबाळकर छाया लोखंडे रेखा चांदणे सारिका माने गिरजा कारंडे कबुतरे मावशी कीर्ती मावशी यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा