Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयात " रोजगार क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मूलभूत तयारी" या विषयावर सेमिनार संपन्न*

 


*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451

येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत डिग्री व डिप्लोमा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १२.०९.२०२४ रोजी "रोजगार क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मूलभूत तयारी" या विषयावर सेमिनार संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

सध्याच्या युगात रोजगाराच्या प्रत्येकसंधीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच रोजगाराच्या संधी व त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत असावे या हेतूने सदर सेमिनार चे आयोजन केले होते. सदर सेमिनारसाठी पुणे येथील अचिव्हर्स अकॅडेमीचे संस्थापक श्री. तुषार कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. या सेमिनारमध्ये श्री. कुलकर्णी यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच सॅप, पॉवरबीआय, अडवान्सड एक्सेल, बीओएम अशा अनेक टेक्नॉलॉजीवरती सखोल मार्गदर्शन केले. प्रस्तुत सेमिनारला महाविद्यालयातील ८० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.

सदर सेमिनार यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेकॅनिकल विभागातील प्रा. वैभव पांढरे व प्रा. शुभम धनवले यांचे सहकार्य लाभले तर महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे यांनी सदर सेमिनारचे समन्वयन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विभागप्रमुख, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख व महावयालायाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश शेटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा