Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*बार्शी येथील "गरीब नवाज फाउंडेशन "च्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रवचन संपन्न...*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451

बार्शी येथे ईद ई-मिलाद मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त गरीब नवाज फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या  विविध स्पर्धेत शहरातील अनेक मशिदीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या स्पर्धेतील  विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे याप्रसंगी पैगंबर जयंतीनिमित्त धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला



   प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित "सवाल जवाब "ची स्पर्धा घेण्यात  आली त्यामध्ये यश प्राप्त केलेल्या  मुलांना बक्षिस देण्यात आले  आणि उपस्थित  प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

      या स्पर्धेसाठी हाफिज खालेद रजा ,मौलाना अन्वारुल हक,  मौलाना मुफ्ती अहेमाद रजा, मौलाना आयाझुल कादरी मौलाना अलफ रजा मौलालाना मोहसिन रजा,आदीनी नियोजन केले होते.  तसेच बार्शी आणि पंचक्रोशीतील सर्व बांधवांनी प्रवचनाचा लाभ घेतला

    याप्रसंगी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा बार्शीचे उद्योजक- हाजी इकबाल भाई पटेल , माजी नगराध्यक्ष आसिफ भाई तांबोळी,  बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब ,हाजी सलीम भाई  पठाण, अबू तालीब शेख , शेखसर,आरीफ शेख, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला  हा कार्यक्रम  यशस्वीरित्या पार पडण्या करिता "गरीब नवाज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा