Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*"कवी इंद्रजीत पाटील" राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

प्रतिभा साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य आयोजित उत्सव पीकपाण्याचा कथा - कविता राज्यस्तरीय स्पर्धेत कवी इंद्रजीत पाटील यांची 'अशीच गावची पांद हाेती ' ही कविता तज्ञ साहित्यिक परीक्षकांनी प्रथम क्रमांकाने निवडली. एकूण २८७ साहित्यकृतीतून या कवितेची निवड करण्यात आली.दि.२३सप्टेंबर २०२४,वार साेमवार राेजी सायंकाळी ७.०० वा. वसुंधरा इंग्लिश हायस्कूल,अकाेट,जि.अकाेला याठिकाणी कवी इंद्रजीत पाटील यांचा यथाेचित सन्मान करण्यात आला.समारंभाचे अध्यक्ष मा.श्री.सुभाषराव ठेंग,प्रमुख पाहुणे मा.अॅड.श्री.गजानन पुंडकर,प्रशांत गावंडे,राम गव्हाणकर, प्रा.डाॅ.श्रीकृष्ण काकडे,पाेलिस विभागातील मा.श्री.अरूण काकड साहेब,उदघाटक मा.श्री.प्रमाेद तुरखडे,स्वागताध्यक्ष मा.श्री.विठ्ठल कुलट सर,विशाल कुलट व प्रतिभा साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.कवी इंद्रजीत पाटील यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.त्यात या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पुरस्काराने आणखीन एक भर घातली आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख व राकेश गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा