*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9730 867 448*
राज्य सरकार प्राथमिक शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून देत आहे शालेय पोषण आहार असो गणवेश असो किंवा आरोग्य तपासणी असो सर्वच बाबतीत शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे मात्र आपसिंगा तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक विभागात दरवर्षी पावसाळ्यात बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेसमोर साचलेल्या पाण्याचा सामना करत वेळप्रसंगी बेडकासारखे उड्या मारत शाळेत दाखल व्हावे लागते लहान मुले या चिखलाला चुकवत असताना किंवा उडी मारून जात असताना पाय घसरला तर हाता पायाला इजा होऊन एकांदा अवयव निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्य सरकार जिल्हा परिषद शाळांना सुविधा उपलब्ध करून देत असताना स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे याकडे दुर्लक्ष का करत आहे ? हे न उघडणारे कोडे असून लहान मुलांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार येथे चालू असून याबाबत शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी शिवाय त्यांनी पाहणी करून त्याबाबत काय उपाययोजना करता येतील ते पाहून शाळेसमोर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी . असे स्थानिक गावकरी ,पालक, नागरिकांतून मागणी जोर धरत आहे..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा