Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

*रूढी परंपरेनुसार सिमुलंगण सोहळ्यात देवीच्या पालखीवर सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकवाचा वर्षावा बाबतचा मंदिर संस्थांनी मनमानीपणे घेतलेला निर्णय माघार घ्यावा...*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

रूढी परंपरेनुसार सिमोलंघन सोहळ्यात देवीच्या पालखी वरती सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकवाचा वर्षाव होत असतो तो बंद करण्याचा  मनमानी निर्णय मंदिर संस्थान ने  घेतला असून तो निर्णय मागे घ्यावा याकरिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, 

श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापूर.

मार्फत:- मा.व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसीलदार, श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापूर. यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे

 याबाबत निवेदनाद्वारे करण्यात आलेली मागणी पुढील प्रमाणे

, अनादिकालापासुन श्री तुळजा भवानी मातेने महिषासुरासी युद्ध खेळून विजय मिळविल्यानंतर त्याचा आनंद उत्सव म्हणून अनादिकालापासुन नगरहून आणलेल्या पालखीत देवीची प्रत्यक्ष मूर्ती ठेवून मंदिराला एक प्रदर्शना मारली जात असते अशी रुढी परंपरा अनादिकालापासुन चालत आलेली आहे. यावेळी भाविक भक्तांकडून देवीच्या पालखी वरती सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकवाचा वर्षाव केला जात असतो, परंतु यावर्षी मंदिर संस्थानने नुकतीच एक बैठक घेऊन या सोहळ्यामध्ये कुंकवाचा वर्षाव बंद करण्याबाबत निर्णय घेतल्याचे कळते. हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढी परंपरा मंदिर संस्थानला बंद करता येत नाही. मंदिरात सध्या अस्तित्वात असलेल्या देऊळ ए कवायत कायद्यानुसार मंदिर संस्थानकडून कुठलाही धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासन तसेच कोर्टाच्या पूर्वपरवानगी शिवाय बदल करता येत नाही. असे असताना सध्या मंदिर संस्थान कोणाचीही बाजू ऐकून न घेता एक कलमी कार्यक्रम हाती घेवून हुकूमशाही पद्धतीने सध्या मंदिर संस्थान निर्णय घेत आहे. सन १९९७  साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजी नगर येथे मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान यांना मंदिरातील जुन्या रूढी परंपरा न मोडण्याचा आदेश झालेला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन करू नये जर या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची कृपया आपण नोंद घ्यावी ही विंनती. या निवेदन निवेदनावर माझी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार व राहुल जी कपले माजी नगरसेवक यांच्या स्वाक्षरी आहे



माहीतीस्तव:-      

1. मा. धर्मदाय आयुक्त, धर्मदास आयुक्त कार्यालय धाराशिव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा