*अकलुज ------प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / ता. २९ : " माहितीची घोकंमपट्टी करून केवळ प्रमाणपत्र व त्याआधारे मिळविलेली नोकरी म्हणजे हुशारी नव्हे, तर माहिती , ज्ञान आणि कौशल्य एकत्र करून त्याचे उपयोजन करणे म्हणजे ती व्यक्ती हुशार आहे , असे समजावे ," असे मत प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी अभिभाषणात व्यक्त केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ( बी. एड. कॉलेज ) विद्यार्थी - शिक्षकांचे उद्बोधन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बी. एड. प्रथम वर्ष वर्गाचा प्रारंभ तसेच शिवाजी विद्यापीठातर्फे महाविद्यालयात चालविण्यात येत असलेल्या आजीवन अभ्यासक्रमांतंर्गत ग्रामीण पत्रकारिता , बालवाडी आणि ग्रंथपाल या कोर्सच्या विद्यार्थ्यांच्या उद्बोधन वर्गाचे स्वागतप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पाटील बोलत होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी - शिक्षकांनी या स्वागतसमारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रा. एस. डी. रक्ताडे यांनी शिक्षकांकडे पाहण्याच्या समाजाच्या विकृत दृष्टिकोनाविषयी ऊहापोह केला . द्वितीय वर्ष वर्ग प्रतिनिधी अनिरुद्ध गौतम कांबळे यांनी महाविद्यालयातील गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. सर्वांनी परस्पर परिचय करून दिला. व्यासपिठावरील मान्यवरांचा हस्ते विद्येची देवता सरस्वती व संस्थाध्यक्ष माजी आमदार( कै .) यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली.
विद्यार्थी - शिक्षक सुरेश तेलवणकर यांनी प्रास्तविक केले. भिवाजी कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. स्मिता कळंत्रे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. अजित लोकरे , प्रा. श्रीमती गुलनास मुजावर , प्रा. संजय जाधव , कार्यालीन अधीक्षक एस. के. पाटील , अनिल इंदुलकर , ग्रंथपाल विशाल शेवाळे, तानाजी मोहिते आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा