Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

*वयाच्या ६७ व्या वर्षी कलेचा मास्टर झाला आहे..* *आनंदाने त्याचा कलेजा फास्टर झाला आहे..* *सेवानिवृत्तीनंतर एम. ए. पदवी प्राप्त करणारे--- सिराज शिकलगार*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मनात जिद्द ,चिकाटी, आणि ठाम निश्चय झाला तर या जगात काहीही अशक्य नाही कोणतेही सत्कार्य करायला वयाची मर्यादा नसते त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे -आंधळी ता. पलूस जि. सांगली येथील सिराज करीम शिकलगार होय  यांनी  40 वर्ष कॉपरेटिव्ह संस्थेत सचिव म्हणून सेवे केल्यानंतर  सेवानिवृत्त झाले त्यांनी मनाशी एक चंग बांधला की मी हे करू शकतो  यामध्ये काहीही अशक्य  नाही त्या अनुषंगाने त्यांनी जिद्द चिकाटी आणि ठाम निश्चयाच्या जोरावरा वयाच्या ६७ व्या वर्षी एम .ए. पदवी प्राप्त केली आणि आपले ध्येय पूर्ण केले
आंधळी .ता.पलूस.जि.सांगली येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक व गझलकार सिराज करीम शिकलगार यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
सहकार क्षेत्रात ४० वर्षे नोकरी करून वयाच्या ६० व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कविता व गझल क्षेत्रात त्यांची आतापर्यंत ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मुळचे डबल ग्रॅज्युयट ( बी.ए. व बी.कॉम.) असून आता त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (महावीर कॉलेज, कोल्हापूर ) मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली आहे. त्यांच्या या जिद्द व चिकाटीला "टाइम्स 45 न्युज "आणि समुहाच्या वतीने मानाचा सलाम...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा