Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

*महर्षी जिमखानाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान*


 

*यशवंतनगर----प्रतिनिधी*

   *नाजिया  मुल्ला*

    *टिइम्स  45 न्युज मराठी*

महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.

        मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या वतीने औक्षण करण्यात आले.

  आपल्या शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षि जिमखान्याचे कार्याध्यक्ष अनिल जाधव, सचिव रवींद्र पवार, संचालक अण्णाजी नायर, तानाजी पिसे या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.

  इयत्ता दहावी अ च्या वर्गामार्फत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. इयत्ता दहावी अ मधील विद्यार्थी ओंकार राऊत याने अभिरुप मुख्याध्यापक म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांना सन्मानित केले. तसेच सर्व अभिरूप शिक्षक आणि शिक्षिका यांनी प्रशालेचे अध्यापनाचे कामकाज पाहिले. प्रास्ताविकात प्रज्ञा चव्हाण हिने गुरु विषयी असणारा आदर व्यक्त केला .विद्यार्थी मनोगतात अक्षता भडकुंबे हिने शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असल्याचे सांगितले. शिक्षक मनोगतात स्नेहलता एकतपुरे यांनी शिक्षक दिनाचे महात्म्य सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली



या कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक भारत चंदनकर ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे, शिक्षक प्रतिनिधी गुलाब कोठावळे, शिक्षिका प्रतिनिधी भाग्यश्री उरवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा शिर्के हिने केले तर आभार संस्कृती म्हमाणे हिने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा