Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

*युवा महोत्सवात" शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे" यश*


 

*अकलूज प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उन्मेश सृजनरंग युवा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयामध्ये नुकताच पार पडला.या युवा महोत्सवामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयाने वक्तृत्व (मराठी) वैयक्तिक कला प्रकारामध्ये कु. प्रेरणा गायकवाड व शास्त्रीय तालवाद्य वैयक्तिक कला प्रकारामध्ये प्रसाद सुळ यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.या विद्यार्थ्यांना नागनाथ साळवे, सुरज ननवरे,अंजनी कश्यप, कृष्णा जगताप या माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

           शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जेष्ठ संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील,प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.संघ व्यवस्थापक डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख,डॉ. सुधा बनसोडे,डॉ.सविता सातपुते, डॉ.अश्विनी रेळेकर यांनी युवा महोत्सवासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा