Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ मार्च, २०२५

*राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट चेकर की दरोडेखोर...?* *मध्यरात्रीच्या वेळी आड रानात निर्मनुष्य ठिकाणी बस अडवून प्रवाशांचे तिकीट चेक करण्याचा प्रकार..*


 

*शंकरनगर ---प्रतिनिधी*

*रियाजभाई---तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-8378 085 427*

 दिनांक 11/ 2 /25 रोजी मोरगाव ते बारामती च्या दरम्यान नागमोडी वळणावर परेल अकलूज बसचा पाठलाग करून निर्मनुष्य ठिकाणी पहाटे चार वाजता आड रानात गाडी आडवी लावून एसटी बस चेक करण्याचा हा अजब प्रकार घडला आहे. वास्तविक पाहता एसटी बस मधील प्रवाशांचे तिकीट चेक करणे हे त्यांचे कर्तव्य आहे मात्र रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी गाडी तील प्रवाशांचे तिकीट चेक करणे कितपत योग्य आहे 

    विशेषत: हीच वेळ दिवसा असती तर काही हरकत घेण्याचे कारण नव्हते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीटचे कसलाही काही मर्यादा आणि कायदे आहे त्या मर्यादेची आणि कायद्याचे पालन ते करतात का ? हेही पाहणे महत्त्वाचे आहे

दिनांक 10/02/25 रोजी परेल आगारा वरून रात्री साडेनऊ वाजता सुटलेली "परेल --अकलूज" ही शिवशाही बस सासवड येथे रात्री 2.30 दरम्यान आली असता ब्रेक फेल झाली. सदर बस दुरुस्त होत नसल्याने सासवड आगारातून दुसरी बस घेऊन पहाटे 3.30 ते 4 च्या दरम्यान अकलूज कडेकडे रवाना झाली. सदर बस मोरगाव येथे पाच मिनिटाचा थांबा घेतल्यानंतर बारामतीकडे मार्गस्थ झाली त्याच वेळी मोरगाव येथे एक बलेरो गाडी थांबली होती. बस पुढे गेल्यानंतर सदर बोलेरो गाडीने मागून पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाच ते सहा किलोमीटर अंतर गेल्यानंतर बोलोरो गाडीने या बसला पास करून पुढे आडवी लावण्यात आली व सदर बोलोरे गाडीतून खाकी कपडे घातलेले तीन इसम उतरून बस कडे धावतच आले व त्यांनी बसमधील प्रवाशाकडील तिकीट चेक करू लागले रात्रीची वेळ असल्याने काही प्रवासी जागे होते तर काही प्रवासी झोपेत होते .त्यावेळी आमच्या लक्षात आले की हे महामंडळाचे तिकीट चेकर अधिकारी आहेत सदर बसमधील प्रवाशांना जर हे तिकीट चेकर आहेत याची कल्पना नसती तर निश्चितच या तिकीट चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रवाशांनी चोप दिला असता कारण रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवणे हे कितपत योग्य आहे की निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळेस गाडी थांबून चेक करणे हे महामंडळाच्या नियमात बसते का? रात्रीच्या वेळी तिकीट चेक कर च्या रूपात रानामध्ये दरोडेखोरच आले तर प्रवाशांनी काय समजायचं हे चेकर आहेत की दरोडेखोर? तेव्हा अशा मस्तवाल अधिकाऱ्यांना प्रवाशांनी चोप देणे योग्य वाटते. तेव्हा महामंडळाने या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व यांना कामावरून बडतर्फ करण्यात करावे अन्यथा असे प्रकार घडले तर प्रवाशां बरोबर काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण ? आणि निश्चितच या अधिकाऱ्यांना चांगला चोप देतील. तेव्हा सदर घटनेस महामंडळ स्वतः जबाबदार राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा