*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----महाराष्ट्र राज्यातील सीसीएमपी ( सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदे तील नोंदणी बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खोटया व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मिडिया, आंदोलने, मोर्चे यामधून सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या स्वााभिमानाला ठेच लागेल अशा प्रकारची वक्तव्ये करत राज्य शासन व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर दबाव आणला आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा हे दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजे पासून मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्याने त्यासाठी रीतसर परवानगी दिली आहे. त्यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून त्यांना राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सीसीएम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स व आयएमए संघटनेत संघर्ष अटळ आहे. मात्र दोन्ही संघटनाच्या डॉक्टरांची नागरिकांना गरज असून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेस वेठीस न धरता मक्तेदारीला विषय न करता सर्वसमावेशक पद्धतीने तोडगा काढावा असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाव्दारे आमरण उपोषणाची माहिती देण्यात आली आहे.
सीसीएमपी अभ्यासक्रम ही जनतेच्या आरोग्याची गरज असून महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्या न्वये या अभ्यास क्रमाची निर्मिती करण्यात आली असून त्यास शासन मान्यता आहे. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सन २०१७ मध्ये बाहेर पडली असून आजपर्यंत हजारो डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला आहे. हा वैध अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा एमबीबीएस समतुल्य होमिओपॅथी अभ्यासक्रम अधिक १ वर्षाचा क्लिनिकल रोटेशन, प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषध शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे सीसीएम पी अर्हताधारक आधुनिक चिकित्सा पद्धतीने रुग्णोपचार करण्यास सक्षम आहेत.
कायदा किंवा कोर्स यावर उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्याचे आयएमए चे वारंवार केलेले सर्व प्रयत्न निष्फळ झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ च्या औषधशास्त्र विभागाने तयार केलेल्या व नॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च मध्ये प्रसिद्ध अहवालानुसार सीसीएमपी कोर्स नंतर आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा
१९६५ मधील तरतूदी नुसार सीसीएमपी अर्हता अधिनियमाच्या अनुसूचित २८ व्या क्रमांकाने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींना अनुसरून सी सीएमपी अर्हता धारकांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद करणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेस अनिवार्य आहे. या परिषदेतील तत्कालीन सत्ताधारी आयएमए च्या दबावाखाली कायद्याची पायमल्ली करून सीसीएमपी अर्हता धारकांची नोंद करण्यास गेली आठ वर्षे टाळाटाळ करत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एम एमसी प्रबंधकांनी विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन केले होते. विधी व न्याय विभागाच्या अभिप्राया सह वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्र पाठवल्यानंतर एमएम सी कडून नोंदणी प्रक्रिया दिनांक १५ जुलै पासून सुरू करण्या बाबत अधिसूचना देण्यात आली. या पूर्णपणे वैध प्रक्रियेस विरोध करताना आयएमए शासनावर नाहक हेत्वारोप व वैद्यकीय सेवा बंद करून जनतेस वेठीस धरण्याच्या धमकीसह इतर मार्गानी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आयएमए च्या
जनतेस वेठीस धरून राज्यात आरोग्य अराजकता माजवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता आयुष डॉक्टर शासनास पूर्ण ताकदीने सहकार्य करण्यास तयार आहेत. संविधान व त्यानुसार केलेल्या कायद्याप्रती आयएमए अविश्वास व्यक्त करत असून त्यांच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध म्हणून तसेच सी सीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा १६ जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.
चौकट : होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलना च्या वतीने आमरण उपोषण, धरणे आंदोलन, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांचे न्याय हक्क
यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी
रविवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता नवी मुंबई येथे महात्मा ज्योतीबा फुले स्मृती भवन, प्लॉट नंबर १२/१३, सेक्टर ३ वाशी पोलीस स्टेशन जवळ, वाशी, मुंबई येथे सभेचे नियोजन करण्यात आले असून येथे महाराष्ट्र होमिओपॅथिक युनायटेड टीमच्या वतीने पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे डॉ. शिवदास भोसले यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा