*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पीटीआय, भुवनेश्वर : भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार संविधानातून 'धर्मनिरपेक्षता' आणि 'समाजवाद' वगळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पक्षाच्या 'संविधान बचाओ' कार्यक्रमाला संबोधित करताना खरगे यांनी भाजपच्या राजवटीत आदिवासी, दलित, महिला आणि युवकही सुरक्षित नसल्याचे खरगे म्हणाले. काँग्रेस सरकारने भारतात १६० सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्थापन केले, तर भाजप सरकारने त्यापैकी २३ उपक्रमांचे खासगीकरण केले, असा आरोपदेखील खरगे यांनी केला. काँग्रेसच्या काळातील सार्वजनिक संपत्ती केंद्र सरकार विकत असून संविधान नष्ट करणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचे खरगे म्हणाले. गरीब आणि आदिवासींचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसने २००६ मध्ये वन हक्क कायदा आणला होता. हा कायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
दलित, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप
खरगे यांनी ओडिशातील भाजप समर्थकांवर दलित आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोपही केला. ओडिशाच्या गंजममध्ये दोन दलित पुरुषांवर अत्याचार करण्यात आला, भुवनेश्वरमध्ये एका सरकारी अधिकाऱ्यावरही सार्वजनिक हल्ला करण्यात आला, असा दाखलादेखील त्यांनी दिला.
उद्योगाच्या नावाखाली भाजप सरकार सर्वत्र जंगले नष्ट करत आहे. जर दलित, आदिवासी आणि तरुण त्यांच्या हक्कांसाठी लढायला शिकले नाही तर ते त्यांनाही नष्ट करतील. –
*मल्लिकार्जून खरगे, अध्यक्ष काँग्रेस*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा