संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत प्रज्योत तात्या गणेश उत्सव मंडळाची यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक ही डीजे मुक्त काढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सागर उरवणे यांनी सांगितले.
डीजे आणि लेझर मुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांसह सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे मंडळाने डीजे व लेझर मुक्त मिरवणूक काढण्याचे ठरविले आहे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणूक ढोल ताशांसह हलग्यांच्या कडकडाटात व टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात येणार असून मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा