संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व इतर सर्व कंपन्याचे मोजमाप करण्याचे काम आश्वासन देऊनही अर्धवट विनाकारण स्थगित करण्यात आल्यामुळे व ज्या कंपनीचे मोजमाप करण्यात आले आहे त्या संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यास गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांच्यामार्फत वारंवार मागील अडीच वर्षापासून दिरंगाई होत असून त्या संदर्भात मौजे तामलवाडी येथील आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी कंपन्याद्वारे होत असलेल्या ग्रामपंचायत कर चूकवेगिरीबाबत वारंवार आवाज उठवत आहेत. प्रशासनाची कर वसुली करणे ही जबाबदारी असतानाही प्रशासकीय अधिकारी काम करण्यास वेळकाढूपणा का करत आहेत असा सवाल श्री सावंत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना केला आहे. एकाच विषयासाठी मागील अडीच वर्षात तीन गटविकास अधिकारी बदललेले असून कामाची काही प्रगती होत नाही त्यामुळे अधिकारीवर्ग कर चुकवेगिरीस खतपाणी घालत आहेत का किंवा इतर शंका निर्माण होत आहेत त्याची तालुक्यात दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे श्री सावंत यांनी पंचायत समिती तुळजापूर येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता उपोषण सुरू करणार असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना इशारा दिला आहे. हे त्यांचे मागील अडीच वर्षांमध्ये कर वसुली संदर्भातचे आत्मदहन आंदोलनासह पाचवे आंदोलन आहे त्यामुळे या आंदोलनाचे तामलवाडी पंचकृषीचे लक्ष वेधून घेतले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा