उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
सारे म्हणत्यात मला
वेडी झाली नदी माय
तुम्ही केले अतिक्रमण
मग मी करू तरी काय !!
नाल्यांना प्लास्टिकने तुंबवता
डोंगर फोडून घर बांधता
मी वहायचं कुठून आणि कसं विचार तुम्ही करत न्हाय
ढगोबा बरस बरस बरसले
माझ्या वाटेत येणाऱ्यांना
त्यांनी पाण्याखाली बुडविले
तुम्हीच सांगा माझं चुकलं काय !
मार्गात माझ्या आडवे येता
घान सारी माझ्याकडे सोडता
जपल तुम्ही तर मी तुम्हा जपेन
निसर्गाची ही चेतावणी हाय !!
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा