Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

अल्खैर अल्पसंख्यांक शिक्षक व शासकीय अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 


विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-9096837451

आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी अल्खै़र अल्पसंख्यांक शिक्षक व शासकीय अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव (उस्मानाबाद) या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शमसुल उलूम उर्दू हायस्कूल धाराशिव या ठिकाणी सकाळी 11:00 वाजता संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक तथा चेअरमन सय्यद खमरोद्दिन सर केंद्रप्रमुख धाराशिव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सय्यद असरार अहेमद साहेब, विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा शिक्षक नेते विक्रम भैया पाटील सर , शिक्षक नेते तथा अल्पसंख्यांक पतसंस्थेचे चेअरमन बशीर तांबोळी सर* , शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील सर सहकार क्षेत्राचे सन्माननीय अधिकारी सय्यद अजीज , उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहा तय्यबअली सर शम्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार शेख मुजीब अहमद साहेब* , शेख मजहर साहेब सी.ए. , मार्गदर्शक शेख मो.हाशम सर , शिक्षक नेते शेख खुदबुद्दीन सर , बेंबळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. शहेनाज औसेकर मॅडम आणि नाना वाघमारे उपस्थित होते. सर्वप्रथम सन्माननीय प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पतसंस्थेचे चेअरमन सय्यद खमरुद्दीन सर यांनी उपस्थितांसमोर प्रस्ताविक सादर केले. वार्षिक अहवाल वाचनाची जबाबदारी सय्यद अजीज साहेब यांनी पार पाडली. प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे कौतुक करत सन्मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सभासदांच्या समक्ष पुढील आर्थिक वर्षात केल्या जाणाऱ्या कामांचे नियोजन व स्वरूप मांडण्यात आले आणि सर्वांच्या मते ठरावांना मान्यता देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी फुलमामडी तोफिकुल आलम सर यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जेवणाचा आस्वाद घेत वार्षिक सभेचे समारोप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा