सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर शहराचा तरंगवाडी तलावातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले असून ते याबाबत सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिली.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती कडून इंदापूर शहरातील पावसामुळे ओढवलेल्या दुर्दैवी परिस्थितीची पाहणी सुरू असतानाच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आगमन झाले. यावेळी नागरी संघर्ष समितीचे संस्थापक, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शहराच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, शिवाजी तरंगे, प्रमोद राऊत, फकीर पठाण, संतोष देवकर, अमोल माने उपस्थित होते.
इंदापूर शहरास उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून उजनीचे पाणी प्रदूषित झाले असून त्यामुळे कॅन्सर सह विविध आजारांचे प्रमाण वाढून त्यामुळे अनेक नागरिक मरण पावले असल्याचे मंत्री भरणे यांच्या श्री. ताटे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी मंत्री यांनी सध्या पावसाच्या साचलेल्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रथम प्रयत्न करू मात्र खडकवासल्याचे रसायनमुक्त पाणी इंदापूरकरांना मिळण्या साठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले असल्याचे श्री. ताटे यांना सांगितले. त्यामुळे वीर भाटघर खडकवासल्याचे शुद्ध पाणी इंदापूरला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पावसाच्या साचलेल्या पाण्याचा योग्uय निचरा होण्यासाठी नगरपरिषदेची योग्य व्यवस्था नसल्याने तसेच ओढानाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे जुन्या कचेरी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले.
सन २०२० मध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर देखील नगरपरिषदेने काहीही उपाययोजना न केल्यामुळे आमच्या हॉस्पिटल मध्ये तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसल्याने आम्हा सर्वांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर नगरपरिषदेने योग्य उपाययोजना न केल्याने यंदा पुन्हा ही परिस्थिती उद्भवली अशी तीव्र प्रतिक्रिया डॉ. पंकज गोरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली तर इंदापूर शहर नागरी
संघर्ष समिती कडून सदर पुराच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी इंदापूर शहराच्या विविध समस्यांचा मंत्री भरणे यांच्यासमोर पाढा वाचला.
घरपट्टीचे व्याज, शास्ती, दंड सर्व महाराष्ट्रात माफ झाला मात्र इंदापूर नगरपरिषदेत माफ होत नसल्याचे मंत्री भरणे यांच्या निदर्शनास श्री. ताटे यांनी आणून दिले. शहरात सध्या कॅन्सरचे रुग्ण वाढत असून तरंगवाडी तलावातून स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, तुम्ही ६१ कोटी रुपयांची सांडपाणी योजना आणली परंतु मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी जेसीबीने रस्ते उखडले आहेत, या खांदलेल्या रस्त्यात दहा इंची किंवा एक फुटाचा पाईप टाकला जात आहे, त्यामुळे या पाईप मधून सांडपाणी जाणार का असा प्रश्न मंत्री भरणे यांना विचारला असता त्यांनी सांडपाण्यासाठी वेगळी लाईन करावी लागेल अशी सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे यांना केली.
इंदापूर शहरांमध्ये गेल्या आठ-दहा वर्षात झालेल्या विकास कामांचा बोजवारा उडाला असून ही सर्व विकासकामे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. बगळ्याने मान टाकली, सिंह जखमी झाला, डाळिंब्याला तेल्या झाला, योजनेने विकास खाल्ला अशी शहरातील कामाची परिस्थिती असून तुम्ही निधी आणला पण दर्जेदार
विकास दिसत नाही अशी नागरिकांची भावना असल्याचे श्री. ताटे यांनी यावेळी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने व्याजमाफी अभय योजना लागू करून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांची व्याजमाफी झाली, परंतु इंदापूर नगरपालिकेने जाणीवपूर्वक व्याज माफी केली नाही. नगरपालिका गाळेधारकांनाही त्रास देत आहे, अशी भूमिका यानिमित्त श्री. ताटे यांनी मांडली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा