Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

संग्रामनगर (अकलूज)येथे हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी दर्गाह मध्ये मु-ए- मुबारक जिरायत से आयोजन


 

विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-9096837451

सालाबाद प्रमाणे याही वर्षी संग्राम नगर अकलूज येथे जियारत मु-ए मुबारक आणि हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी(र्.अ) यांचा 32 वा उरुस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हजरत पीरो मुर्शिद अलहाज अब्दुल गणी बेग,(बाबजी र.अ )राजस्थान--व सुफी -ए-हिंद सय्यद मखदूम सोफी अब्दुल्ला इब्राहिम (र्.अ) यांना स्मरून करण्यात आले असून यावर्षी या निमित्त शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी जिरायत मु-ए -मुबारक व हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी (र्.अ) यांच्यासंदलची मिरवणूक सायंकाळी 6 वाजता विजय चौक येथून निघणार असून ती भक्ती भावाने संग्राम नगर येथे जाणार आहे त्यानंतर

शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभर मु-ए- मुबारक व हाजी हाफिज यांच्या समाधीचे चे दर्शन घेता येणार आहे सायंकाळी 6 नंतर हिंदू मुस्लिम बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

    दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता जीआरत होणार असून हा सर्व कार्यक्रम शहजादा-ए-बाबजी पिरे तरीकत हाजी अब्बास भाई बेग आणि शहजादा ए. बाबजी पिरे तरीकत यादेअली( राजस्थान) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तरी सर्व प्रेषितांवर प्रेम करणारे अनुयायांना विनंती करण्यात आली आहे की आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच याचा लाभ घ्यावा असे आवाहन आशिकाने कमिटी हाजी हाफिस फतेह मोहम्मद जोधपुरी संग्राम नगर चे अध्यक्ष सलीम खान दाऊद खान पठाण कमाल रहिमान शेख सचिव अजिज हसन कलाल यांच्या वतीने करण्यात आले आहे

    *विशेष बाब*

महिलांसाठी खास पडद्याची व्यवस्था करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा