Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

अल् फत्हा मस्जिद जमात च्यावतीने (ईद मिलादुन्नबी) पैगंबर जयंती भक्ती भावाने साजरी


 

विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-9096837451

सर्व जगातील एकमेव शांतीदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची 1500 वी जयंती अल् फत्हा मस्जिद( तांबळी वसाहत) संग्रामनगर येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली 

    या जयंतीनिमित्त तांबोळी वसाहत मध्ये मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत लहान थोर व अबाल वृद्ध सर्वजणांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीत नातखानी मिलाद चे पटन करत प्रेसितांचा जयजयकार करत" नारे तकबीर अल्लाहू अकबर-- नारे रिसालत या रसूल्लाह-- सरकार की आमद मरहबा ---बच्चा बच्चा कहेता है नबी हमारा सच्चा है' आदि नारे देत प्रेषितांचा गुणगान करण्यात आला



       या मिरवणुकीनंतर अल् फत्हा मस्जिद मध्ये फातेहाखानी नंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला 

    याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष हाजी आदम भाई तांबोळी ,अल् फत्हा मस्जिद जमात चे अध्यक्ष --हमीद भाई मुलाणी तसेच तांबोळी वसाहत मधील लहान मोठे आबालवृद्ध उपस्थित होते 

  हा मिलादुन्नबीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वसाहत मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा