संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशभरात भाजपकडून मतांची मोठ्या प्रमाणावर जी चोरी होत आहे ती सबळ पुराव्यांसह उघडकीस आणलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार मोहन जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्येही मतांची चोरी होण्याच्या संभाव्य शक्यतेमुळे टेंभुर्णी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने त्याविरोधात जोरदार घोषणा देवून सुजाण नागरिकांच्या सह्यांची मोहीम कालपासून हाती घेण्यात आलेली आहे.
'वोट चोर, गद्दी छोड़' ह्या मुद्द्यावर सर्वत्र सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. टेंभुर्णी शहरात एकूण ६ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये जावून तेथील नागरिकांशी संवाद साधून ही सह्यांची मोहीम चालू आहे. यामुळे मतांची होणारी चोरी तर, थांबेलच. परंतु, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होवून देशभरातील मत चोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी टेंभुर्णी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंत देशमुख यांनी टेंभुर्णी शहराची लोकसंख्या जास्त असल्यामुळे संपूर्ण शहरात मोहीम राबविण्यास अजून थोडा कालावधी लागेल असे सांगितले. ही मोहीम सर्व नागरिकांपर्यंत जास्तीतजास्त कशी पोहोचेल याची काळजी टेंभुर्णी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल. शहरातील नागरिकांचा सदरील स्वाक्षरी मोहीमेला मिळणारा प्रतिसाद हा खरोखरच अभूतपूर्व असा आहे.
याठिकाणी युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे जिल्हा समन्वयक सुर्यकांत लोंढे, शहर उपाध्यक्ष प्रथमेश यादव, सचिव राम साळुंखे, शहराचे कार्याध्यक्ष सागर सटाले, सहसचिव किरण घळके, अतुल मांढरे, प्रवीण लांडगे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा