Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

हैद्रा ता.अक्कलकोट येथील" हजरत ख्वाजा हाजी पीर सैफनमुलुक(र्.अ)" यांच्या उर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


 

मुख्यसंपादक ---हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी-अकलुज

मो:-- 9730 867 448

हैद्रा ता.अक्कलकोट जि. सोलापूर येथील महाराष्ट्र कर्नाटक ,आंध्र प्रदेश राज्यातील समस्त हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभाव, एकता ,बंधुता ,चे प्रतीक असणारे. हजरत ख्वाजा हाजी पीर सैफनमुलुक (र्.अ) यांच्या ८९२ व्या उर्स निमित्त दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

   या उर्स निमित्त शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता चुना देण्याचा( म्हणजेच दर्गा ला रंगरंगोटी करण्यात येणार आहे) त्याच दिवशी रात्री १ वाजता गुस्ल (म्हणजेच समाधीला विधिवत प्रमाणे धार्मिक पठण करत (मजार) समाधी स्वच्छ करून समाधीला अत्तर चंदन लावणे) होणार आहे 

     रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री संदल चा कार्यक्रम होणार आहे सोमवार दि१७ नोव्हेंबर २०२५ रोजी चिरागा (दीप प्रज्वलन) 



    मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर२०२५ रोजी सकाळी जीआरत (उर्स ची सांगता) संपन्न होणार असून महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून येणाऱ्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घ्या अशी आवाहन हजरत हाजी ख्वाजा पीर सैफनमुलुक दर्गाहचे खादीम खुद्दाम (पुजारी) चांदसाहब मुलुकसाहब मुजावर आणि सर्व मुजावर बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा