Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर शहरात मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा सुरू करण्याची प्रदीप गारटकर यांची मागणी बँकेचे नूतन अध्यक्ष तनवीर पी ए इनामदार यांनी तत्वता मागणी केली मान्य


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

इंदापूर शहरात मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली.

इंदापूर शहर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असून शहराचा झपाट्याने विकास होत आहे. या शहरात मुस्लिम समाजाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी तसेच त्यांना मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम को ऑप. बँक शाखेची स्थापना इंदापुरात होणे गरजेचे आहे. इंदापूर शहरातील मुस्लिम समाज छोटे मोठे व्यवसाय करत असून त्यांची आर्थिक उलाढाल देखील चांगल्या प्रमाणावर आहे, जेणे करून बँकेलाही चांगला व्यवसाय मिळेल असेही त्यांनी सांगितले.

बारामती येथे अल्ताफ हाजी हैदर भाई सय्यद व एकता ग्रुप बारामती यांच्या वतीने बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तनवीर पी ए इनामदार व उपाध्यक्ष ॲड. आयुब शेख यांचा सत्कार आमदार इद्रिस नायकवडी तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांची असलेली मागणी श्री. गारटकर यांनी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळासमोर ठेवली. या मागणीला त्यांनी तातडीने होकार देऊन शाखा सुरू करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा