Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत द्या अन्यथा खासदार प्रणिती शिंदे यांचा उपोषणाचा इशारा...* *पंढरपूर तालुक्यातील बोहाळी अनवली आणि सरकोली या अतिवृष्टी व पूरग्रस्त भेट देऊन झालेल्या केली पाहणी.


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती शिंदे यांनी आज मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील बोहाळी, अनवली आणि सरकोली या अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.


या भेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. सरकारने संवेदनशीलतेने वागून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट हेक्टरी ५०,००० रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी. आज शेतकरी जगला पाहिजे, हेच सरकारचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाढवून द्या, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू. पंचनामे करताना दूजाभाव न करता सरसकट व निष्पक्ष पंचनामे करण्यात यावेत,” असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.



तसेच, अनवली गावातील शेतकऱ्यांनी भाटघर कॅनॉलचे अनावश्यक सुरू असलेले पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांचे म्हणणे होते की, अनवलीत कॅनॉलमधून सतत पाणी सोडल्याने शेतीच्या जमिनींना पाझर लागून मोठे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून भाटघर कॅनॉलचे पाणी बंद करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन खासदार शिंदे यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा