Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष-- "प्रदीप गारटकर "यांचा गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यात संवाद दौरा पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहण्याची त्यांनी केले आवाहन


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तसेच पदवीधर मतदार नोंदणी मोहीम, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत विचार विनिमय करून निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उद्या गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्याचा सुसंवाद दौरा आयोजित केला आहे.  

हा दौरा गुरुवारी सकाळी नऊ वाजता आळंदी येथून सुरू होणार असून सकाळी अकरा वाजता चाकण येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर

दुपारी साडे बारा वाजता राजगुरुनगर, दुपारी दोन वाजता मंचर येथे 

सायंकाळी सहा वाजता जुन्नर येथे बैठक होणार आहे. रात्री साडे आठ वाजता शिरूर येथे या सुसंवाद दौऱ्याचा समारोप होणार आहे.

तरी संबंधित भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी वेळे वरती उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा