संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
मराठवाड्याचा हंबरडा, मराठवाडाव्यापी आंदोलन अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व बाधीत व्यक्तींना आर्थिक मदत तात्काळ देणे संदर्भात गोंधळ घालून धरणे आंदोलन करण्यात आले असून त्या संदर्भात धाराशिव शिवसेना (उ बा ठा )पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुळजापूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे निवेदना द्वारे केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे
धाराशिव जिल्हयात व तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. या दळभद्री सरकारने मराठवाड्यातील व धाराशिव जिल्हयातील सर्व शेतकरी, व्यापारी व घरादारावर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन, शेतकऱ्यांना या सरकारने देशोधडीला लावलेले आहे.
शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे.
राष्ट्रीय बैंका, पतसंस्था, मल्टीस्टेट बैंका, सोसायटी यांची जी सक्तीची वसुली चालु आहे ती त्वरीत थांबवण्यात यावी.
@ तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी.
तुळजापूर तालुक्यातील धरण, ओढे, नाले गोवोगावच्या शेतकत्यांच्या जमीनी पीक, फळबाग, सोयाबीन, उडीद गेली 5 महीन्यापासुन पाण्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. तरी त्वरीत एक्करी फळबागेला 2 लाख व इतर पिकांना 1 लाख रुपये त्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावे.
तुळजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे तुडुंब भरुन पुर आल्यासारखे दिसत असुन सदरील अतिवृष्टीमुळे शेतकरी पुढील पाच वर्ष उबदारी येणार नाही तो उध्वस्त झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टी शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत बीना व्याजी व 10 वर्ष परतफेड मुदतीवर कर्ज देण्यासाठी बैंकेंना त्वरीत आदेश देण्यात यावेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन त्यांच्या मुला मुलींची शैक्षणीक फिस माफ करण्यात यावी.
नवरात्र माहेत्सवात संपुर्ण 09 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर येथील यात्रेवर त्याचा परिणाम झाल्या त्यामुळे शहरातील व्यापारी, पुजारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असुन त्यांना शासनाने प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्यात यावी.
तरी वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात तसेच या वेळेस तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व बाधीत व्यक्तींना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामालताई पवार. शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र कानडे. तालुकाप्रमुख जगन्नाथजी गवळी. तुळजापूर शहरप्रमुख राहुलजी खपले. सुधीरजी कदम व शहर संघटक अर्जुनआप्पा साळुंखे. माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडकेपाटील. श्याम पवार. उपतालुकाप्रमुख सुनील जाधव .सरदारसिंग ठाकूर. कृष्णा मोरे. युवा नेते ऋषिकेशजी मगर सुजित हंगरगेकर सरपंच शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखाताई मुळे व तुळजापूर शहरप्रमुख मीनाताई कांबळे गौरीशंकर कोडगिरे .शंकर जमादार. रोहित चव्हाण. भरत जाधव .सागर इंगळे. महादेव पवार. श्रीकांत बिराजदार. अमोलजी गवळी सरपंच .बालाजी पांचाळ सिद्धरामआप्पा कारभारी. चेतन बंडगर .सागर सुरवशे. मोहन जाधव. मनोज गायकवाड. कृष्णा घाटशेळे. विशाल जाधव. राजकुमार साळुंखे. प्रकाश जाधव. परमेश्वर चिमुंडे. बलभीम मनशेट्टी .विष्णू घोडके. बाळासाहेब बोबडे .संतोष जाधव. शाहूराज लोखंडे. श्यामसुंदर फुलमाळी. परमेश्वर जाधव. श्रीशैल बेलोरे .बाळासाहेब शिंदे .भीमाशंकर गिराम. सुनील जमदाडे. शंकर गव्हाणे. समाधान कुंभार .विठ्ठल शिंदे .इमाम नजर शेख .सुनील राजमाने. प्रशांत नवगिरे . अनिल छत्रे .सौदागर जाधव .बालाजी जाधव. अन्यथा शिवसेना स्टाईल मध्ये तिवृ आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिनामास शासन जबाबदार राहील अशाप्रकारे निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारताना तुळजापूर तहसीलदार श्री बोळंगे साहेब उपस्थित होते यावेळेस तुळजापूर तालुका काँग्रेसचे अमोलजी कुतवळ. अमरजी मगर. आनंद जगताप. बालाजी तट .रंजीत इंगळे .यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा