*संपादक हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
चि. महेश आणि चि.सौ. का -सरिता यांचा विवाह माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
अकलूज येथील कांदा बटाटा चे होलसेल व्यापारी "लालासाहेब निवृत्ती मोरे "यांचे चिरंजीव -महेश यांचा विवाह म्हसवड (हवालदार वाडी) ता. माण जि. सातारा येथील सुखदेव शिवाजी सावंत यांची कन्या चि. सौ. का.- सरिता हिच्याशी शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी माळीनगर ता.माळशिरस जि. सोलापूर येथील "सौभाग्य मंगल कार्यालय" येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री- विजयसिंह मोहिते पाटील ,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन- जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती- मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार- रणजित सिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच -किशोर सिंह मानेपाटील ,संग्रामसिंह मोहिते पाटील ,अकलूज ग्रामपंचायत माजी उपसरपंच -धनंजय भाऊ देशमुख, पांडुरंग भाऊ देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती -सयाजी राजे मोहिते पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते
त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आग्रा येथील बटाट्याचे व्यापारी तसेच सातारा फलटण करमाळा बारामती इंदापूर पुसेगाव आदी भागातील व्यापारी आणि अकलूज आणि पंचक्रोशीतील मोरे परिवारावर प्रेम करणारे नागरिक हजारोंच्या संख्येने वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी
या विवाहप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले राजकीय सामाजिक शेतकरी व्यापारी इत्यादी विविध क्षेत्रातील चाहत्यांनी विवाह उपस्थित राहिल्याने नवरदेवाचे वडील लालासाहेब मोरे भावनिक होऊन म्हणाले की आज तागायत मी मोहिते पाटील परिवाराशी एकनिष्ठ राहिल्याने परिवारातील जवळजवळ दहा ते बारा मान्यवर नेते माझ्या मुलाच्या विवाहास उपस्थित राहून वधू वरास शुभ आशीर्वाद दिले हे मी माझे भाग्य समजतो आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तसेच आज पर्यंतच्या माझा प्रत्येक समाजाप्रती असलेले प्रेम त्यांच्याशी असलेले बंधू भावाचे संबंध आणि प्रत्येकाशी मी विनम्रपणे वागुन संबंधअबाधित ठेवल्याची ही माझी कार्याची व वर्तणुकीची पोचपावतीच असल्याचे भावोदगार लालासाहेब मोरे यांनी व्यक्त केले







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा