Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

*श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी.* ---------- प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय शालेय समूह नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

 *अकलूज प्रतिनिधी*

    *केदार   लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय शालेय मुला मुलींच्या नृत्य स्पर्धेत ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस व शहरी गटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

                 अभिनेते वैभव चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र बक्षिस देण्यात आले.यावेळी ॲड.नितीन खराडे-पाटील,दिपकराव खराडे- पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,परीक्षक योगेश देशमुख,कुणाल मसाले,प्रेम आर्लेकर, उपाध्यक्ष पोपट भोसले- पाटील,बिभीषण जाधव,डॉ. विश्वनाथ आवड,संजय गळीतकर यांचेसह संचालक,सदस्य,कलाकार, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





          प्रस्ताविकात कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की,प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कला,क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.ग्रामीण भागातील उदयमुख कलावंतांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश असून मागील ४८ वर्षात ६० हजारापेक्षा अधिक        कलाकारांना येथे संधी प्राप्त झाली आहे.यावर्षी २ हजार ३ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.१२६ बाहेरच्या शाळांनी सहभाग घेतला तर जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १ लाख २५ हजाराचे अनुदान मंडळाने दिले आहे.स्पर्धेचे यश हे कलाकार,पालक,मार्गदर्शक शिक्षक व मंडळाच्या सर्व सदस्यांचे आहे.


*स्पर्धेचा निकाल-*

गट (११ वी ते महाविद्यालय) प्रासंगिक नृत्य प्रथम क्रमांक  सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड रिसर्च शंकरनगर अकलूज, द्वितीय क्रमांक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज,तृतीय क्रमांक-(विभागून) महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज,

*गट ग्रामीण  (५ वी ते १०वी)* प्रासंगिक नृत्य,प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय,माणकी द्वितीय क्रमांक श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस,तृतीय क्रमांक मोरजाई विद्यालय मोरोची

*शहरी गट*, प्रथम क्रमांक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,द्वितीय क्रमांक (विभागून) सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,


*चौकट...*

प्रताप क्रीडा मंडळ मागील ४८ वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हा मंच उपलब्ध करून देत आहे. भविष्यात यातून खूप मोठे कलाकार निर्माण होतील. 

           वैभव चव्हाण (अभिनेते)


आंतरराष्ट्रीय पध्दतीचा हा समूहनृत्य स्पर्धेचा कार्यक्रम असल्याचे जाणवते.असा शिस्तबद्ध  कार्यक्रम कुठेही पहावयास मिळत नाही. एवढा उत्साह व आनंद कलाप्रेमीमध्ये दिसून आला. कलाकारांसाठी ही संधी असल्याचा  मला आनंद आहे.

    प्राजक्ता घाग (अभिनेत्री)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा