Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

*ऑल इंडिया जमेतूल कुरेश प्रदेश सचिव पदी--" बिलाल कुरेशी" यांची निवड*

 *प्रतिनिधी --एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



ऑल इंडिया जमेतुल कुरेश प्रदेश सचिव पदी निवड केंद्रीय कुरेशी समाज राष्ट्रीय संघटना प्रदेश सचिव पदी निवड सर्वत्र होतोय होतो कौतुकाचा वर्षाव 

शिराढोणचे भूमिपुत्र बिलाल भाई कुरेशी यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील भूमिपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तसेच निर्भीड पत्रकार बिलाल भाई कुरेशी यांनी आपल्या कार्याचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त त्यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असतानाच, आता त्यांची ऑल इंडिया जमेतुल कुरेश (कुरेशी समाज) या राष्ट्रीय संघटनेच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

समाजहितासाठी सातत्याने झटणारे, वंचित व दुर्लक्षित घटकांचा आवाज बुलंद करणारे बिलाल भाई कुरेशी हे आज नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आणि समाजसेवेतील निष्ठा यामुळेच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

“मूर्ती लहान, पण कीर्ती महान” ही म्हण बिलाल भाई कुरेशी यांच्या कार्याला अगदी तंतोतंत लागू पडते. त्यांच्या या निवडीमुळे शिराढोण गावासह कळंब तालुका आणि संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात त्यांच्या हातून समाजासाठी अधिक भरीव व विधायक कार्य घडो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष आरेफभाई चौधरी यांनी ईमेल द्वारे देण्यात आले आहे


  बिलाल कुरेशी यांची ऑल इंडिया जमेतूल कुरेश संघटनेच्या राज्य सचिवपदी निवड झाल्याबद्दल

टाइम्स 45 न्यूज मराठी ग्रुपच्या वतीने हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा