उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,या प्रसंगी प्रमुख पाहुणे नॉन कमिशन ऑफिसर विकास जगदाळे,सौ.रेश्मा जगदाळे, वीरपत्नी सुरेखा जाधव ,गणपत जाधव, सिव्हील इंजिनियर अमित दत्तू पवळ यांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत व ध्वज गीतानंतर विद्यार्थ्यानी बहारदार नृत्य व देशभक्तीपर भाषणे उत्साहात करून उपस्थितांची मने जिंकली . .
सध्या काश्मीर येथे सीमेवर कर्तव्य बजावणारे जवान विकास जगदाळे यांनी " ए दुश्मन खुदको शेर समझता है ना,तो हम इंडीयन आर्मी भी शिकारी है जहा तुझे देखेंगे वहा ठोकेंगे ".अशा जोषपूर्ण शब्दांनी सीमेवरील अनुभव सांगत आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी भारताच्या संविधानाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि नागरिकांचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुलशन शेख तर उपस्थितांचे आभार शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालक संघाचे अध्यक्ष महादेव कोळेकर,उपाध्यक्ष निलेश वाघ ,महिला पालक संघ अध्यक्षा निकिता मोरे ,तमन्ना शेख यांनी प्रयत्न केले .खावू वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा