Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० जानेवारी, २०२६

*जाती वाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी माळशिरस पोलिसात चौघा जणा विरुद्ध गुन्हा दाखल*

 *संपादक ---टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9730867448*


जबाब ता. 10/01/2026

मी दादा तुकाराम खुडे वय 40 वर्षे धंदा (जे. एम. म्हात्रे कंपनीमध्ये सुपरवायजर) जात हिंदु मातंग रा. मांडवे ता. माळशिरस जि. सोलापुर समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की,( मो. नं. 9850087110



मी वरील ठिकाणी माझी पत्नी शितल, मुलगा प्रथमेश, मुलगी भाग्यश्री असे एकत्रात राहणेस असुन मी जे. एम. म्हात्रे कंपनीमध्ये सुपर वायजर म्हणुन गेले 06 वर्षापासुन कामास असुन त्यावर माझे कुटुंबाची उपजिवीका करतो. सध्या जे.एम. म्हात्रे कंपनीचे सदाशिवनगर गावमध्ये सालगुडे पाटील यांचे घरासमोर लक्ष्मी देवीचे मंदीराचे काम चालु आहे.


काल दि. 09/01/2026 रोजी सकाळी 10/15 वा. चे सुमारास मी व माझे सोबत मुर्ती रेड्डी सध्या रा. नातेपुते ता. माळशिरस, चालक निलेश मोहिते, सुरज माने दोघे रा. मोरोची ता. माळशिरस सोमनाथ दनाने रा. मांडवे असे पुणे ते पंढरपुर रोडवर हायवेचे पेट्रोलिंग गाडी 1033 चे महिंद्र बोलेरो गाडी नं. MH 43 CK 5575 ने मांडवे ता. माळशिरस येथुन माळशिरसकडे येत असताना जे. एम. म्हात्रे कंपनीचे सदाशिवनगर येथील लक्ष्मी मंदिराचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्याच वेळी तेथे हरी विठ्ठल पालवे रा. पुरंदावडे ता. माळशिरस हे तेथे आले व मला म्हणाले की मंदिराचे कामकाज का बंद आहे असे म्हणाले असता मी म्हणालो की सेंट्रींग मिस्त्री छगन कांबळे याचे घरी बोकडाचा कार्यक्रम असल्याने आज रोजी काम बंद आहे. लक्ष्मी मंदिराचा स्लॅप दोन दिवसात टाकुन देतो असे म्हणालो असता हरी पालवे हे म्हणाले की तुझ हे कायमचच चालु आहे मांगा तुला लय माज आला आहे तुझे हातपाय मोडतो अशी धमकी देवुन मला हाताने माझे गालावर डोक्याचे पाठिमागे जोराने मारहाण केली व आमचे गाडीत कोण कोण आहे असे म्हणुन गाडीत असलेल्या मुर्ती रेड्डी यास गाडीतुन खाली उतरवुन त्याला व मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व मारहाण केल्यानंतर हरी पालवे याने त्याचे सोबतचे तीन अनोळखी इसमांना सांगीतले की या

 दोघांना मी सांगत नाही तो पर्यंत येथुन उठुद्याय चे नाही उठले तर त्यांचे काठीने हातपाय मोडा असे सांगुन तो निघुन गेला व हरी पालवे हा दहा मिनीटांनी त्या ठिकाणी परत आला व मी उभा राहिल्याचे पाहुन ये मांगट्या तु खाली बस असे म्हणुन ये पोरांनो या मादरचोतांना उठु देवु नका लय नाटक केली तर यांची गाडी पेटवून द्या मी आता मिटिंगला चाललो आहे मी संध्याकाळी आल्यानंतर याचे काय करायचे ते मी पाहतो असे म्हणुन निघुन गेला. त्या तीन अनोळखी इसमांनीआम्हा दोघाला सायंकाळी 06 वा. पर्यंत तसेच बसवुन ठेवले व तेथुन ते अनोळखी तीन इसम निघुन गेले नंतर आम्ही आमची गाडी घेवुन घाबरुन घरी निघुन गेलो. त्यानंतर मी सदर घटने बाबत जे. एम. म्हात्रे कंपनीचे संचालक अरुण म्हात्रे यांना फोनद्वारे सदरची घटना सांगीतली त्यांनी मला वरील झालेल्या घटने बाबत पोलीस ठाणेस जाउन तक्रार देण्यास सांगितले परंतु मी माझ्या मुलाच्या पायावर गाईने पाय दिल्यामुळे त्याच्यावर दवाखाना उपचार करण्यास उशिर झाल्याने तक्रार देण्यास आज रोजी माळशिरस पोलीस ठाणेस आलो असता मला मारहाण झाल्याचे मी पोलीसांना सांगितल्यामुळे पोलीसांनी मला दवाखाना यादी दिली मी उपचार घेवुन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आलो आहे.

तरी दि.09/01/2026 रोजी सकाळी 10/15 वा. ते सायंकाळी 06/00 वा. चे दरम्यान लक्ष्मी मंदिराचे कामकाज पाहण्यासाठी सदाशिवनगर येथे मी माझे सहकाऱ्यासोबत आलो असता हरी विठ्ठल पालवे रा. पुरंदावडे ता. माळशिरस जि. सोलापुर याने मंदिराचे काम बंद का ठेवले आहे या कारणावरुन मला जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच माझ्या सोबत आलेले सहकारी मुर्ती रेड्डी यास ही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच सायंकाळी 06/00 वा. पर्यंत रोडचे कडेला आम्हा दोघांना हरी विठ्ठल पालवेच्या सांगण्यावरुन त्याचे तीन अनोळखी साथीदारांनी बसवून ठेवले म्हणुन माझी हरी विठ्ठल पालवे रा. पुरंदावडे व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. 

याबाबत माळशिरस पोलीस ठाण्यात

भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023-115(2), 352, 351(2),  3(5) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती( अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम-1989,3(1)(r)--3(1)(s)--3(2)(va) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून उपविभागीय अधिकारी संतोष वाळके हे अधिक तपास करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा