Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० जानेवारी, २०२६

*करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील एकाने पोटच्या दोन चिमुकल्या* *मुलांना विहिरीत टाकून केली हत्या* *या घटनेने करमाळा तालुका हादरला*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

*अलीमभाई शेख* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतुर गावांमधील जाधव कुटुंबातील एकाने आपल्या जन्मदात्या पोटच्या दोन आवळ्या जावळे मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याने करमाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे सदर घटनेने करमाळा तालुका हादरला आहे जन्मदात्या बापानेच असे राक्षसी कृत्य केल्याने सर्वत्र त्या राक्षसी बापाचा तीव्र शब्दात संताप व्यक्त होत आहे 

करमाळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात झरे येथे विद्युत ऑपरेटर म्हणून वीज कर्मचारी असणाऱ्या जाधवने आपल्या जन्मदात्या दोन आवळ्या जावळे मुलांना रेल्वे स्टेशन शेजारी असणारे विहिरीत फेकून त्यांची क्रूर हत्या केली आहे हत्या झालेल्या मुलांमध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे

 सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण करमाळा तालुका हादरला आहे. केत्तूर येथील संबंधित व्यक्ती असून त्याची शेती हिंगणी हद्दीत आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.

किरकोळ घडलेल्या घटनेतून राग आल्याने बापाने दोन चिमुकल्या मुलांना रेल्वे स्टेशन शेजारी असणाऱ्या विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर काही वेळाने त्यानेच स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वजण विहिरीकडे धावत गेले मात्र तोपर्यंत चिमुकल्यांचा जीव गेला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलं जुळी होती. यामध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी होती वडिलांचे नाव सुहास ज्ञानदेव जाधव (वय ३२) असल्याचे समजत आहे. तर मृत्यू झालेल्या मुलांची नावे शिवांश सुहास जाधव वय सात वर्षे तर श्रेया सुहास जाधव वय सात वर्षे आहे.

बापाने निर्दयपणे हत्या केलेल्या मुलेही आवळी जावळी होती बापाने केलेल्या या हत्या मुळे मात्र करमाळा तालुका हादरला आहे याबाबत करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा