Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

*श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल कुपनचे वाटप*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


जातेगाव ( ता. करमाळा ) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी " रोटरी क्लब ऑफ, कळंबोली " यांच्या वतीने 20000 रुपये किमतीचे इयत्ता दहावीच्या अभ्यासासाठी उपयुक्त कुपन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री इसुब शेख सर श्री बुधवंत सर आणि श्री अनिल काळुंखे सर उपस्थित होते. यावेळी काळुंखे सरांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासातील सातत्य, शिस्त, नियोजन आणि उपलब्ध साधनाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. 

या कुपनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयाचा सखोल अभ्यास ,स्वाध्याय, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, कृतिपुस्तिका तसेच इतर शैक्षणिक घटकांचा वापर करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने घरबसल्या अभ्यासाची सुविधा घर बसल्या उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस चालना देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या या मोलाच्या  योगदानाबद्दल प्रशालीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने अभ्यास करता येईल आणि त्यांच्या यशाच्या वाटचालीस निश्चित बळ मिळेल असा विश्वास प्रशालेचे मुख्याध्यापक  श्री इसुब शेख सर यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा