*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमळा तालुक्यामधील नुकत्याच संपन्न झालेल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या सर्व उमेदवाराचे विजयाचे खरे शिल्पकार म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप हे होय असे करमाळा तालुक्यामधील मतदारा मधून चर्चिले जात आहे
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महायुती मधील म्हणजेच भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या सर्व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवाराला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भरघोस आशीर्वाद तसेच पाठिंबा दिला होता माजी आमदार जगताप यांच्यामुळेच आम्ही विजयी झालो व आम्हाला पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता आली असल्याचे विजयी उमेदवार बोलून दाखवित आहे माजी आमदार जगताप यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाच परंतु अहोरात्र त्यांच्या विजयासाठी अथक परिश्रम व कष्ट घेऊन सभा घेतल्या त्याचा परिणाम अखेर उमेदवार विजयी केले माजी आमदार जगताप यांच्या भूमिकेमुळे विरोधक देखील हतबल झाले होते जिकडे गुलाल तिकडे विजय याप्रमाणे माजी आमदार जगताप यांनी महायुतीतल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले होते माजी आमदार जगताप यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल यांची कन्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या भाजप प्रणित सर्व उमेदवाराला तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व उमेदवार यांना आपला जाहीर पाठिंबा दिला होता जाहीर पाठिंबा तसेच जगताप साहेबांचे आशीर्वाद यामुळेच महायुती मधील बहुसंख्य उमेदवार विजयी झाले
जिकडे विकास तिकडे आम्ही असा पवित्रा घेत माजी आमदार जगताप यांनी महायुतीमधील उमेदवाराला विजय करण्याचे एक प्रकारे प्रतिज्ञा घेऊन त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्णत्वास नेऊन मिनी मंत्रालय अर्थात सोलापूर जिल्हा परिषद तसेच करमाळा तालुका पंचायत समिती मध्ये त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी विजयी उमेदवार पाठविले आहे
माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणारा वर्ग आजही सोलापूर जिल्हा तसेच करमाळा तालुक्यामध्ये आहे त्याचाच फायदा घेत माजी आमदार जगताप यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना महायुतीतल्या सर्व उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार माजी आमदार जगताप यांचे पाठबळ यामुळेच महायुतीमधील उमेदवार निवडून आले आहे असे मतदार वर्गात बोलले जात आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा