श्रीपूल--बी.टी.शिवशरण..
स्वाभिमान चैतन्य बुलंद नेतृत्व अस्मितेचा जागर आणि रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी चळवळीचा आवाज म्हणजे फर्डे वक्ते माझे जवळचे शालेय मित्र सन्माननीय नंदकुमार केंगार यांना आज वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत असताना त्यांच्या विषयी अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत सच्चा मित्र तळमळीचा कार्यकर्ता उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावून धडपडणारा आक्रमक नेता म्हणून सोलापूर जिल्ह्यात नंदकुमार केंगार यांचे नाव माहीत नाही असा व्यक्ती विरळाच
चळवळीवर निष्ठा अभ्यासू व्यक्तिमत्त्व तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा प्रामाणिक स्वभाव यामुळे माळशिरस तालुक्यातील नव्हे तर इंदापूर पंढरपूर माढा सांगोला मंगळवेढा आटपाडी जत सांगली पुणे मोहोळ भागात नंदकुमार केंगार यांनी आपला संपर्क वाढवून अनेक तरुण कार्यकर्ते माणसं जोडली आहेत दिन दलित उपेक्षित बहुजन समाजांतील घटकांवर अन्याय अत्याचाराच्या घटनांवर ते कमालीचे चिडून प्रचंड आक्रमक भूमिका मांडतात मग कोणी जात्यांध धर्मांध नेता पुढारी कार्यकर्ता असो त्याचे त्याचे पोस्टमार्टम करून त्याची खानदान उध्वस्त करण्याचा इशारा देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची माय बहिण काढून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडतात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे ते राज्य उपाध्यक्ष म्हणून सक्रिय सहभाग घेऊन पक्षाची धुरा सांभाळत आहेत आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक विचारवंत कवी लेखक यांच्या विचारधारेला प्रमाण मानून आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांत त्यांचं नाव अग्रस्थानी राहिले आहे विचारांचा प्रभाव व शब्दाला धार असणारे ते फर्डे वक्ते म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो त्यांना अन्यायाची प्रचंड चिड आहे दलबदलू व विकाऊ कार्यकर्त्यांचा ते खरपूस समाचार घेतात चळवळीवर निष्ठा वैचारिक बौद्धिक प्रगल्भता जपणारे नंदकुमार केंगार यांना समाजातील अंधश्रद्धा अंध रुढी बदमाश गीरी याबद्दल संताप आहे दमदार विचारांचा अभ्यासू नेता तसेच रिपब्लिकन पक्षाचे काम जोमाने करणारा हा खंबीर नेता आजही सामान्य जिवन जगतो आजही साध्या घरात रहातो चारचाकी वाहन नाही राज्यभरातील मीटिंग सभा दौरे एसटी ने प्रवास करतो नंदकुमार केंगार यांच्या नंतर सर्वच राजकीय पक्षातील सामान्य कार्यकर्ते नेते हे केंगार यांच्या बरोबर राहून त्यांचे सामाजिक राजकीय नेतृत्वाचे धडे घेतले ते आज सुख संपन्न व ऐशोआरामात चारचाकी गाड्या आलीशान बंगले बांधून रहात आहेत मात्र पुर्ण वेळ समाजकारण राजकारण चळवळ पक्षाचे काम जोमाने करणारा एक लढाऊ कार्यकर्ता प्रामाणिक नेता माझी घरची चटणी भाकरी बरी म्हणून रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी चळवळीचा आवाज बनून काम करतोय हे चळवळीला भूषणावह आहे माझा शालेय मित्राचा नावलौकिक व कार्य पाहून आम्हाला मनापासून आनंद वाटतो व ऊर अभिमानाने भरून येतो
.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा